नमस्कार

महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री गजानन, सर्व कार्याचा शुभारंभ आपण त्याचेच नाव घेऊन करतो. अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत. अष्टविनायक मंदिराची माहिती करून देणारी बरीचशी संकेतस्थळे इंग्रजीमध्ये आहेत. आणि त्यातही बर्‍याचशा संकेतस्थळांवर फक्त जाहिरात बाजी करून  अष्टविनायकबद्दल माहितीचा स्त्रोत उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेऊन मला अष्टविनायकाचे एकमेव मराठी संकेतस्थळ असाव ही संकल्पना सुचली. आणि त्या नुसार कामाची सुरूवात केली. आपल्या "मराठी भाषा दिनी" मी हे संकेतस्थळ माझं मराठीसाठीच छोटसं योगदान म्हणुन अर्पण करत आहे.  

 

आपला

राज मेस्त्री