Visiters Review, Articles & Feedback

Share your reviews on Ashtavinayaka Tour & Experience

1) Article & Review 


|| वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

         या श्लोकाचे स्मरण करून आपण आपले प्रत्येक कार्य समाधानाने, आनंदाने सिध्दिस जावे अशी मनोमन प्रार्थना करतो.या मनोभावे केलेल्या सकारात्मक विचारांतूनच आपला आत्मविश्र्वास दृढ होत असतो.साहजिकच केलेले कार्य उत्तम होते. हे कार्य विविध प्रकारचे असते. ते प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर ठरते. कुणाला पर्यटनाची, कुणाला गड- किल्ल्यांची, कुणाला वाचनाची, कुणाला खेळण्याची तर कुणाला विविध कलांची आवड असते. आपली आवड जोपासण्यासाठी व्यक्ती अनेक प्रकारांनी त्याचा वैविध्यतेचा शोध घेत असते. या शोधातूनच अनेक गोष्टी सापडतात,समजतात. ज्यांना पर्यटनाची आवड आहे. त्या व्यक्ती सातत्याने वेगवेगळी ठिकाणे शोधीत असतात. ठिकाण मिळाले तरी त्या जागी पोहचण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यात ती जागा, तिथे कसे पोहोचायचे तो मार्ग, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी साधने,त्यांची उपलब्धता,राहण्याची सुविधा, जेवण्याची सुविधा, तेथील पर्यटन बिंदू,स्थळे इ.माहिती असणे गरजेचे असते. जर आपल्याकडे सर्व माहिती उपलब्ध असेल तर आपला प्रवास सहज, सोपा व आनंददायी होण्यास मदत होते. असाच आनंददायी प्रवास अनुभवण्याची संधी आपल्याला Ashtavinayak.in या संकेतस्थळाला (Website) भेट देऊन अनुभवता येईल.


         Ashtavinayak.in या संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे आराध्य व लाडके दैवत गणपती बाप्पाच्या आठ रुपांची म्हणजेच अष्टविनायकांची संपूर्ण माहिती आॅनलाईन बघायला मिळेल. या संकेतस्थळावर जाऊन आपण सहजच आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांच्याबद्दल असणारा इतिहास, त्या मंदिराचे वैशिष्ट्य, त्याची बांधणी, आख्यायिकाइ. बद्दल जाणून घेता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथे कसे जायचे याचा मार्गही आणि मनोभावे गुणगुणण्यासाठी बाप्पाची आरतीही.

       Ashtavinayak.in या संकेतस्थळावर ओझरचा - विघ्नहर, लेण्यांद्रिचा - श्री.गिरीजात्मज, थेऊरचा- श्री.चिंतामणी, रांजणगावचा - महागणपती, सिध्दटेकचा- श्री.सिध्दीविनायक, मोरगावचा-श्री.मयुरेश्वर, पालीचा- श्री.बल्लाळेश्वर, महडचा- श्री.वरदविनायक.


चला जाऊ या.. सहलीला...
चौसष्ट कलांचा अधिपती..
तुमचा आमचा गणपती..
चला दर्शना जाऊ या....
कार्य सिद्धीस जाण्या...
आशिर्वाद घेऊ या......
गणपती बाप्पा मोरया.....

अष्टविनायक यात्रेचा सोहळा पूर्ण करण्यासाठी, संपूर्ण यात्रेची
माहिती.....फक्त आणि फक्त तुमच्यासाठी..."Ashtavinayak.in"वर उपलब्ध.

sangita-pakhale
- सौ.संगीता प्रकाश पाखले
Headmistress , Dnyanmandir vidyasankul,
Shri.K.R.Kotkar secondary & Higher secondary Vidyalay,
MIDC,Dombivli (East).
 
 

2) Review by Tour Guide 


The website information and content is very unique and needful for every to visit the astavinayka's Ganesha temple. We can get all the necessary information here from how to reach the destination to your place or accommodation. Also, you can get the emergency contact number, Bhakta Niwas details here which will be very useful. The overall content is present in very simple language which will be understood by anyone. Thank you Ashtavinayak.in team for this tour information and all.
pawan-perdeshi
- Mr. Pawan Rajput
Tour Guide
Maharashtra State, Nashik City.