मयुरेश्वर

मोरगाव येथे गणेश चतुर्थी, गणेश जन्म, आणि विजयादक्षमीच्या वेळी मोठया प्रमाणात उत्सव साजरा केला जातो.

 
     
 

सिद्धिविनायक

येथे वर्षातून भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात उत्सव साजरे केले जातात. या कामात तीन दिवस व तीन रात्री पालखी निघते.

 
     
 

बल्लाळेश्वर

श्री बल्लाळेश्वर येथे भाद्रपद ते पंचमी या काळात मोठा उत्सव असतो. माघ शुद्ध चतुर्थीलाही इथे उत्सव साजरा केला जातो.

 
     
 

विघ्नेश्वर

ओझर्मध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच त्रिपुरी पोर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो.

 
     
 

चिंतामणी

भाद्रपद महिण्यात येथे खुप मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच माधवराव पेशवे व त्यांची पत्नी रमाबाई यांची पुण्यतीथी पण साजरी केली जाते.

 
     
 

गिरिजात्मक

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला व माघ शुद्ध चतुर्थीला इथे उत्सव साजरे केले जातात.

 
     
 

वरदविनायक

श्री वरदविनायकाची त्रिकाल पुजा होत असते. इथे माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जन्म उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. भाद्रपदमध्येही इथे उत्सव साजरा केला जातो.

 
     
  महागणपती  
  इथे भाद्रपद शुध चतुर्थीला मोठा उत्सव साजरा केला जातो.